गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

ग्रीक दैवतशास्त्र

 

इतिहासाचा धांडोळा घेताना भारत आणि ग्रीस या दोन देशांमध्ये असलेले संबंध “इंडिका , पेरीप्लस ऑफ इरिथ्रियन सी ” सारख्या इतिवृत्तांमधुन,पुढे जावुन सम्राट अलेक्झांडर व पोरस यांच्या कथांमधुनही दिसुन येतात.भारतीय आणि ग्रीक पौराणिक कथांमध्येही अनेकदा साम्य आढळते.हया दोन्ही देशांना प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे. पाश्चात्य संस्कृतीचा अभ्यासा करताना तिचे बीज प्राचीन ग्रीक संस्कृतीमधे अभ्यासकांना दिसुन येते.जसे आपल्याला  रामायण,महाभारत ,कालिदास,भवभुती तसे ग्रीक संस्कृती म्ह्णताच आठवतात ते होमरसारखा कवी, सॉक्रेटीस, प्लेटो सारखे तत्त्वज्ञ, हिरोडोटस सारखा इतिहासकार.

भौगोलीक दृष्ट्या वेगवेगळ्या ठिकाणी राहणारा मानवी समाज एखादी विशिष्ट गोष्ट करताना एकसारख्या पद्धतीने विचार करतो असे आढळुन आले आहे.त्याच्या त्यावेळी आसलेल्या भावभावना बहुधा एकाच प्रकारच्या असाव्यात असेही दिसुन येते. आसपासच्या निसर्गातील आणि दैनंदिन जीवनातील घटनांचे कुतुहल व भिती या दोन्हींमुळे,त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करताना माणसांने त्या घटनांसाठी देव वा देवता यांपैकी एका दैवी शक्तिस कारणभूत मानले.उदा. समुद्राची समुद्रदेवता, नद्यांच्या देवता, वनदेवता, सूर्यदेवता, चंद्रदेवता. ग्रीक पुराणकथांमध्ये यांसारख्या व इतरही अनेक देवता आहेत. अमरत्वा बरोबर मिळलेल्या काही अमानवी शक्ती सोडल्यास या देवता माणसांपेक्षा अजिबात वेगळ्या नाहीत. ज्यांच्यापुढे बिचारा माणूस सदैव अगतिक असतो अश्या काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ ह्या विकारांसह सर्व मानवी भावना त्या व्यक्त करतात.

 या ग्रीक देवदेवतांकडे न्यायबुद्धी, उदात्तता खरोखरच फारशी दिसत नसली तरीही प्राचीन ग्रीसमध्ये लोकांची या देवतांवर श्रद्धा होती.होमरची 'इलिअड' 'ओडिसी' हि ग्रीक महाकाव्ये या पुराणकथांवर आधारीत आहेत. एस्किलस, सॉफोक्लिस, युरिपिडिस यांच्या नाटकांमध्येही या पुराणकथांचे व देवतांचे संदर्भ येतात.फ्रॉइडसारख्या आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी मनोगंडांना किंवा मनोविकारांना नार्सिसस मनोगंड, इडिपस गंड यांसारखी नावे पुराणकथांमधल्या व्यक्तींवरुन दिली आहेत. ख्रिस्तपूर्व आठव्या शतकातल्या अनेक मातीच्या भांड्यांवर या पुराणकथांवर आधारीत चित्रे रंगवलेली मिळालेली आहेत.

माणसांवर दुनियेवर ऑलिंपस पर्वतावर राहणारे हे सर्व देव बारीक लक्ष ठेवुन असतात. ऋग्वेदातला 'द्यौस्'शी साम्य असलेले ”झ्यूस” हे या देवांच्या राजाचे नाव. तो क्रोनोस हया सर्व सृष्टीचा जो राजा आहे त्याचा मुलगा.त्याच्या मरणानंतर झ्यूस स्वर्गाचा राजा झाला. हाच झ्यूस पुढे रोमन पुराणात ज्युपिटर बनतो. झ्युस बाबत तो क्रीट देशाचा अतिशय शूर राजा होता आणि मरणानंतर त्याला देवत्व मिळले असे काही विद्वानांचे मत आहे.त्याच्यात व भारतीय पुराणातल्या इंद्रामधे सारखेपणा आहे. याची सत्ता आकाशावर व ढगांवर चालते. तो सुगीचा व पिकांचाही देव. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट हे त्याचं प्रतीक. राक्षसी गरुड पक्षी हा त्याचा दूत आहे. काही ठिकाणी झ्यूसचे वास्तव्य पवित्र ओक वृक्षात मानले जात असे. त्याला कौल लावून संदेश, आज्ञा घेतल्या जात असत. जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा अलेक्झांडरही युद्धापूर्वी झ्यूसला कौल लावत असे.जसे एखादे ऋषी घोर तपश्चर्या करायला लागले की इंद्राचे सिंहासन डळमळीत होऊन त्याला भय वाटुन तो पृथ्वीवर अप्सरा पाठवून त्या ऋषींची तपश्चर्या भंग पावण्याची तजवीज करतो त्याप्रमाणे  आपले सिंहासन अढळ राहावे म्हणून झ्यूस काळजी घेत असतो. ऑलिंपसवर त्याच्यासाठी खेळाच्या स्पर्धा होत असत. याच आद्य ऑलिंपिक स्पर्धा. झ्यूसची वेदी दगडी नव्हती. वर्षानुवर्षे त्याच्यापुढे मेंढ्या व बैल बळी दिले जात असल्यामुळे ती राखेचीच बनलेली होती. तो कायदे व नीती यांचं रक्षण करतो. आतिथ्य, अतिथी धर्म हे त्याचं ब्रीद. हा धर्म न पाळणाऱ्यांना, अतिथी वा अनोळखी माणसांना त्रास देणाऱ्यांना, खोटं बोलणाऱ्यांना, व्यापारात फसवणाऱ्यांना तो शिक्षा करतो. त्याचं हत्यार म्हणजे दुधारी कुऱ्हाड असे.(परशुराम?)ग्रीक पुराणातल्या त्याच्या सगळ्याच शिक्षा महाक्रूर आहेत. त्यांची वर्णने वाचून थरकाप होतो. त्यावरुन माणसांना जरब बसवण्यासाठी प्राचीन संस्कृतीत क्रूर शिक्षा करीत असत असे दिसते.  वास्तविक पाहाता, या शिक्षा आपल्याला न्याय्य वाटत नाहीत. प्रॉमीथिअसच्या कथेमधे  पृथ्वीवर अग्नी नाही म्हणून याने स्वर्गातून वा ऑलिंपस पर्वतावरून अग्नी चोरून आणला, म्हणून झ्यूसने त्याला भीषण शिक्षा दिली. त्याला खडकाला बांधले गेले आणि एक गरुड पक्षी रोज त्याचे काळीज खात असे. रात्री पुन्हा ते काळीज नव्याने तयार होई आणि सकाळी गरुड ते खायला येई. प्रॉमीथिअस अमर असल्यामुळे ही शिक्षा चिरंतन होती. महाभारतातल्या अश्वत्थाम्याची आठवण व्हावी अशी ही कथा. प्रॉमीथिअसला त्याच्यासारखेच जखमांचे व दुःखाचे अमरत्व मिळाले.राजा टॅन्टॅलसकडून झ्यूसचा व देवतांचा अपमान झाला.म्हणुन त्याला तलावात उभे राहाण्याची शिक्षा झाली. त्याच्या डोक्यावर फळांनी लगडलेल्या झाडाची फांदी होती.तहान लागल्यावर तो तलावातल्या पाण्याला तोंड लावायला लागला की पाणी खाली जायचे. भूक लागल्यावर फळासाठी हात वा तोंड पुढं केलं की त्या फांद्या बाजूला जायच्या. कॉरिन्थचा राजा सिसिफसने लबाडी केली.त्याच्या लबाडीबद्दल त्यानं एक मोठा पाषाण डोंगरावर ढकलत न्यायचा आणि तिथून खाली ढकलून द्यायचा.परत खाली यायचं आणि पुन्हा पुन्हा हेच काम करायचं अशी शिक्षा झाली.

ऑलिंपसच्या स्वर्गात वा पृथ्वीवर सुंदर स्त्री आढळली की ती झ्यूसचीच असते. इंद्राची कथा एका अहल्येशी निगडित आहे. झ्यूसच्या मात्र अनेक कथा आहेत. सर्वात प्रसिद्ध म्हणजे टिंडारस राजाची राणी लेडा हिची कथा. हिच्याकडे झ्यूस हंसाच्या रूपात गेला. त्यांच्या मिलनातून दोन अंडी निर्माण झाली. त्यातून क्लायटेम्नेस्ट्रा व हेलन या दोन स्त्रिया निर्माण झाल्या.

यातील हेलनसाठी ट्रॉयचे प्रसिद्ध व विनाशकारी युद्ध झाले.होमरच्या 'इलिअड' या महाकाव्याची नायिका 'हेलन' असली तरी नायक मात्र तिचा नवरा मेनेलॉस वा प्रियकर पॅरीस नसुन त्या युद्धाच्या अग्रभागी असलेला समुद्रदेवता थेटिसचा पुत्र “अकिलीस” हा शूर योद्धा आहे. या वीराच्या जन्मानंतर थेटिसला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला अपोलोने सांगितले, की 'या नवजात बालकाला अपोलोच्या देवळामागच्या तळ्यात बुचकळून वर काढ, म्हणजे त्याचा देह अभेद्य होईल.' थेटिसने तसे केले. फक्त तिने त्याला पाण्यात बुचकळताना त्याच्या टाचा धरल्या होत्या. साहजिकच टाचा वगळता त्याचे सर्व शरीर अभेद्य बनले. बाण, भाले कशानेच त्याला जखम होत नसे. शेवटी पॅरीस आणि अपोलो यांनी त्याच्या टाचेवर विषारी बाण मारले, तेव्हा तो मरण पावला(आपल्या कृष्णासारखेच).यामुळेच इंग्रजीत 'अकिलीसची टाच' Achilles' heel असे शब्द परिपूर्ण असलेल्या गोष्टीतील अपुर्णता-मर्यादा-दुर्बलता सांगण्यासाठी वापरतात. अकिलीसला एक शाप होता.जर त्याला पराक्रमी म्हणून कीर्ती मिळाली तर तो अल्पायुषी होईल आणि दीर्घायुष्य हवे असेल तर आपले शौर्य गुंडाळून ठेवून निष्क्रिय आयुष्य त्याला जगायला लागेल.त्याने निष्क्रियता नाकारुन पराक्रमी अल्पायुष्याची निवड केली.

नार्सिसस हा देखणा तरुण होता. एकोचे त्याच्यावर प्रेम बसले; पण त्याने प्रतिसाद दिला नाही. ती झुरत राहिली आणि तिची वाचा क्षीण झाली. ती फक्त ऐकलेल्या शब्दांतले शेवटचे शब्द उच्चारू शकत असे. आजही ती प्रतिध्वनीच्या रूपात ऐकलेल्या शब्दातले शेवटचे शब्द उच्चारत असते. पुढे एकदा नार्सिसस तळ्याकाठी बसला असता सहज त्याने पाण्यात पाहिले. ते प्रतिबिंब आहे हे त्याला समजले नाही. तो त्या पाण्यातल्या सुंदर तरुणाच्या प्रेमात पडला. त्याच्या सौंदर्याकडेच पाहात राहिला आणि तिथून उठूच शकला नाही. झुरणीला लागला. अखेर त्याचे एका फुलात रूपांतर झाले. सिग्मंड फ्रॉइडने स्वतःवरच्याच अतिरिक्त प्रेमात रमण्याच्या विकृतीला 'नार्सिसस गंड' असे नाव दिले आहे.

ओडिसी या महाकाव्यात ओडिसिअसने आपल्या घरादाराची जबाबदारी 'मेन्टॉर'कडे सोपवली होती. त्याने ती उत्तम प्रकारे पार पाडली. इंग्रजी भाषेत उत्तम प्रकारे काळजी घेणाऱ्याला मेन्टॉर असाच शब्द आहे.ग्रीक पुराणात विचित्र आकाराचे देव व मानव आहेत. सायक्लॉप्सला एकच डोळा व तो कपाळावर मध्यभागी असतो. जानसला दोन विरुद्ध दिशांना असणारे दोन चेहरे आहेत. सेन्टॉरचे अर्धे शरीर मानवी व अर्धे घोड्याचे आहे. मेंढपाळांचा देव पॅन याला मेंढ्याचे कान, पाय व शिंगे आहेत. तो अचानक प्रकट होऊन प्रवाशांना घाबरवून सोडायचा. त्यातूनच इंग्रजीत अती घाबरणे याला 'पॅनिक' असा शब्द आला. हिप्नॉस हा झोपेचा देव. तो अधोलोकात राहातो आणि त्याने कधी उजेड पाहिलेला नाही. त्याचे वर्णन अगदी काव्यमय आहे. तो तरुण आहे आणि सर्वांना हवाहवासा असतो. त्याला पंख आहेत. थकलेल्या माणसांच्या कपाळावर तो हळुवारपणे आपल्या हातातली डहाळी फिरवतो किंवा त्यांच्या पापण्यावर एका गुंगी आणणाऱ्या द्रवाचे थेंब टाकतो. याचा पुत्र मॉर्फिअस हा स्वप्नांचा देव आहे. आजच्या वैद्यकीय शास्त्रात वेदनाशमन व शांत करणाऱ्या औषधांना हिप्नॉटिक आणि मॉर्फिन असे शब्द असणे हे सार्थच आहे.

क्रीटचा राजा मिनॉसने डेडॅलॉस आणि इकॅरस या पिता-पुत्रांना डोंगरावर कैदेत टाकले. तेव्हा डेडॅलॉसने पक्ष्यांची गळलेली पिसे, पंख गोळा केले. त्यामधून मोठे पंख तयार करून ते स्वतःला व इकॅरसला मेणाने चिकटवले. दोघे उडत तुरुंगाबाहेर पडले. डेडॅलॉस खाली जाण्यासाठी बजावत असूनही इकॅरस आणखी वर वर उडत राहिला, अगदी सूर्याजवळ जाऊ लागला. सूर्याच्या उष्णतेने मेण वितळले आणि इकॅरस समुद्रात पडून बुडून मरण पावला.

चॅरॉन हा वृद्ध, दाढीधारी आणि थकलेला देव. तो स्टिक्स या नदीचा नावाडी आहे    (आपल्याकडच्या वैतरणी नदी). मृतांच्या आत्म्यांना या स्टिक्स नदीपार करणे हे त्याचे काम आहे. त्याच्या नावेचे शुल्क एक नाणे असते. अनेक संस्कृतीत व जमातींत मृताच्या तोंडात नाणे ठेवण्याची पद्धत होती व काहींमध्ये आजही आहे. ते नाणे या चॅरॉनसाठी असते.

अतिशय देखण्या 'टिथोनस'वर इओस म्हणजे उषादेवता अनुरक्त झाली व तिने त्याला आपल्याबरोबर स्वर्गात नेले. त्याला अमरत्व दिले; पण दुर्दैवाने चिरतारुण्य द्यायचे मात्र राहून गेले. टिथोनस वृद्ध झाला आणि कुरूप दिसू लागला. मरण्याची शक्ती असलेल्या धरणीवरच्या मानवांचा त्याला हेवा वाटू लागला. त्याला मरण हवे होते, पण देवता आपले वरदान मागे घेऊ शकत नाहीत. अखेर त्याचे रूपांतर नाकतोडा किड्यात झाले.

अपोलो सौंदर्य, संगीत, वैद्यक, धनुर्विद्या, भविष्यकथन या सर्व गोष्टींचा देव.कसांन्ड्रा या ट्रॉयच्या राजकन्येच्या सौंदर्याने भारावून गेला. त्याने तिला भविष्यकथनाची विद्या दिली; पण कसान्ड्रा वश होत नाही म्हटल्यावर तिच्या भविष्यकथनावर कोणी विश्वास ठेवणार नाही असा त्याने तिला शाप दिला.ट्रॉयच्या युद्धनंतर अॅगॅमेम्नॉनला घरी परत जाऊ नकोस कारण, क्लायटेम्नेस्ट्रा तुझी व माझी हत्या करणार आहे हे सांगतले होते. त्याने विश्वास ठेवला नाही. तिला आपल्याबरोबर नेले. क्लायटेम्नेस्ट्राने त्या दोघांची हत्या केली.

“हेरॅक्लीस”हा साहसी व शक्तिमान वीर. त्याला रोमन संस्कृतीत हर्क्युलीस म्हणतात. तो पाळण्यात असताना त्याच्यावर हल्ला करणाऱ्या दोन सर्पांच्या मुंड्या त्याने मुरगळल्या.   नऊ डोकी असलेल्या हायड्रा नावाच्या सर्पाला त्याने ठार मारले. या नऊ डोक्यांपैकी मध्यावरचे अमर होते. इतर डोक्यांपैकी कोणतेही कापले की त्याच्या जागी दुसरी दोन डोकी उगवायची; पण हेरॅक्लीस त्याला जाळण्यात यशस्वी झाला. काही काळ त्याने पृथ्वीचा भार डोक्यावर घेतला होता.

पॅन्डोराला दिलेली पेटी उघडायची नाही, अशी अट घातलेली होती. बराच काळ संयम पाळुन पॅन्डोराने अखेर पेटी उघडलीच. त्याबरोबर आतील सुख, प्रेम, संपत्ती वगैरे सर्व भेटी बाहेर पडून निघून गेल्या. तिने घाबरून पेटी बंद केली तेव्हा एकच भेट पेटीत शिल्लक राहिली होती. ती म्हणजे आशा.   

महाकवी होमर याच्या 'इलिअड' या महाकाव्यात 'ट्रॉय'च्या युद्धाची कथा सांगितली आहे. अलौकिक सौंदर्यवती हेलन, महायोद्धा अकिलीस, पॅट्रोक्लस, हेक्टर आणि मेनेलॉस यातील प्रमुख पात्रे. मात्र हि कथा घडण्यास कारण ठरते ती प्रेमदेवता अ‍ॅफ्रोडिटी किंवा व्हिनस.एकोणिसाव्या शतकात हाइनरिख श्लीमान या पुरातत्त्वज्ञाने प्राचीन ट्रॉयच्या जागी उत्खनन केले आणि ऐतिहासिक ट्रॉय शहराचे वेगवेगळ्या काळातले सात थर दिसून आले. म्हणजे या वैभवशाली शहरावर संपत्तीसाठी हल्ले होत होते आणि त्याची संपत्ती इतकी होती, की उद्ध्वस्त होऊनही ते पुन्हा पुन्हा वसवले जात होते. ट्रॉयचं युद्ध त्रिभुवनसुंदरी हेलनसाठी व हेलनमुळे घडलं अस जरी मानलं तरी , दुसरे महत्वाचे कारण ट्रॉयच्या अफाट संपत्तीसाठीही ते असणार. अकिलीसने सुरुवातीस लढायचं नाकारणं आणि युद्धात भाग घेतल्यावर, मित्र पॅट्रोक्लस याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी पराक्रम करून हेक्टरला ठार मारणं या यातील प्रमुख घटना आहेत. हेलन देवराज झ्यूस व राणी लेडा यांची कन्या. तिच्या अलौकिक सौंदर्यामुळे कित्येक राजे तिला मागणी घालायला आले. पण ती कोणालाच स्वीकारत नव्हती. तेव्हा त्या सर्वांनी तिला सांगितले, 'आमच्यापैकी एकाला निवड. बाकीचे निघून जाऊ.' अखेर स्पार्टाचा राजा मेनेलॉसला तिने पसंत केले. या इतर राजांनी परतून जाताना खिलाडूपणे सांगितले, की भविष्यात त्या दोघांवर काही संकट आल्यास ते मदतीला येतील. हेलन-मेनेलॉसने सुखात राहायला काही हरकत नव्हती.पण देवी अ‍ॅफ्रोडिटीच्या (प्रेमदेवता) मनात तसे नव्हते.ऑलिंपसवरच्या एका देवतेच्या मेजवानीला तिने आयरिस नावाच्या भांडखोर देवतेला बोलावले नव्हते. आयरिसने म्हणुन  मेजवानीला न येता  मेजवानीच्या महालाच्या बाहेरून खिडकीतून तिने एक सोन्याचे सफरचंद आत टाकले. 'अ‍ॅपल ऑफ डिस्कॉर्ड!' त्याच्यावर लिहिले होते - 'सर्वाधिक सुंदर स्त्रीसाठी.' आता त्या महालातील प्रत्येकच देवतेला वाटत होते, की तीच सफरचंद मिळण्यास पात्र होती.   पण तीन देवता सर्वांना पुरून उरल्या. त्या म्हणजे झ्यूसची पत्नी हेरा, अथीना आणि अ‍ॅफ्रोडिटी. बाकी सर्वजणी निघून गेल्या. या तिघींपैकी सफरचंद कोणाला मिळावे, असा प्रश्न आला. तिघी झ्यूसकडे गेल्या; पण तो तरी कसा निवाडा करणार? पत्नी हेराला सफरचंद द्यावे तर पक्षपातीपणाचा आरोप येणार.त्याने पॅरिसल, जो ट्रॉयचा राजा प्रायॅमचा मुलगा होता, त्याची न्यायाधीश म्हणून निवड केली.पॅरिसच्या जन्मानंतर ज्योतिषांनी भविष्यवाणी केली की हा मुलगा ट्रॉयचा सत्यानाश करणार. प्रायॅमने घाबरुन सेवकांना त्या बाळाला जंगलात नेऊन मारून टाकायला सांगितले. ते बाळ बघून सेवकांची मने द्रवली. त्यांनी एक मेंढी मारून तिच्या रक्ताने बाळाचे कपडे भिजवले आणि बाळाला मारल्याचा पुरावा म्हणून प्रायॅमला दाखवले.त्या बाळाला एका धनगराने उचलून नेले आणि त्याला आपल्या झोपडीत प्रेमाने वाढवले. त्याचे नाव पॅरिस ठेवले. पॅरिस अतिशय देखणा तरुण बनला.तो रानात मेंढ्या चारायला गेला असताना त्याच्यासमोर हेरा, अथीना आणि अ‍ॅफ्रोडिटी या तीन देवता उभ्या ठाकल्या. तो बावचळून गेला. देवींनी आपल्या आगमनाचा हेतू सांगितला. त्याच्या हातात सफरचंद दिले व 'आमच्यापैकी जी सर्वाधिक सुंदर वाटेल तिला हे दे,' असे सांगितले.तो त्यांच्याकडे पाहातच राहिला. मग तिघींनी सफरचंदाच्या बदल्यात आपण काय देऊ ते सांगितले.हेरा सफरचंदाच्या बदल्यात मोठे राज्य द्यायला तयार होती, तर अथीना विद्याकलांचे ज्ञान देणार होती. अ‍ॅफ्रोडिटीने सांगितले की सफरचंदाच्या बदल्यात त्याला जगातली सर्वाधिक सुंदर स्त्री मिळेल. तरुण सुंदर पॅरिसने सफरचंद अ‍ॅफ्रोडिटीला दिले. हेरा आणि अथीना क्रोधाने पाय आपटत निघून गेल्या. अ‍ॅफ्रोडिटीने पॅरिसलात्याचे जन्मरहस्य सांगितले. 'तू प्रायॅम राजाचा पुत्र आहेस, त्याच्याकडे जाऊन आपला अधिकार मागून घे. त्याप्रमाणे पॅरिस प्रायॅमकडे गेला. त्याने पॅरिसला ठेवून घेतले.राजपुत्राचे अधिकार दिले. अशाच अधिकारातून तो स्पार्टाला गेला. तिथे राजा मेनेलॉस आणि राणी हेलनने त्याचे स्वागत केले. अ‍ॅफ्रोडिटीने आपले काम केले. हेलन पॅरिसवर अनुरक्त झाली. पाहुणचार घेत असतानाच एके दिवशी पॅरिस हेलनला घेऊन ट्रॉयला निघून गेला. मेनेलॉस हबकला. त्याचा वडील भाऊ अ‍ॅगॅमेम्नॉन संतापला. त्याने ट्रॉयला विनंत्या, धमकावण्या, खलिते पाठवले. मोठा भाऊ हेक्टर, राजा प्रायॅम सर्वांनी पॅरिसला समजावले पण तो ऐकायला तयार नव्हता. अखेर अनेक जहाजे घेऊन अॅगॅमेम्नॉनने ट्रॉयच्या दिशेने कूच केले. हेलनसाठी जे आले होते ते राजेही आपले वचन पाळून मदतीला धावून आले. हे युद्ध दहा वर्षे चालले  शेवटी पोकळ लाकडी घोड्यात सैनिक बसवून तो नगरात घुसवला गेला. रात्री त्या सैनिकांनी बाहेर पडून ट्रॉय शहराची राखरांगोळी केली.अ‍ॅफ्रोडिटीपुढे हेलेन आणि पॅरिस दोघेही अगतिक आहेत.होमर हेलनला चंचल, व्यभिचारी स्त्री म्हणून रंगवत नाही. तिला सर्व सामान्य स्त्रीप्रमाणे आपल्या घरादाराची आठवण येत असते. पश्चात्ताप होत असतो.ट्रॉयचे युद्ध संपल्यावर मेनेलॉस हेलनला घेऊन स्पार्टाला गेला आणि कोणतेही अग्निदिव्य वगैरे न करता हेलन पुन्हा स्पार्टाची राणी झाली. हेलनचे व्यक्तिमत्त्व मात्र वेगळे आहे. ओडिसीच्या प्रारंभी होमर सांगतो की टेलेमॅकस स्पार्टाला जातो आणि ओडिसिअसबद्दल चौकशी करतो. तेव्हा राणी हेलन त्याचे आदरातिथ्य करते.

‘'इलिअड' 'ओडिसी' ही दोन्ही काव्ये मौखिक आहेत.'इलिअड'चा खरा नायक आहे अकिलीस. अतिशय चपळ आणि शूर अकिलीसवर ग्रीकांचा विजय अवलंबून होता. त्याचा मित्र पॅट्रोक्लस याला हेक्टरने मारले, म्हणून अकिलीसने मोठा पराक्रम करून हेक्टरला ठार केले. त्याचा देह रथाला बांधून रणभूमीवर फिरवला आणि स्वतःच्या तंबूत नेऊन ठेवला. हेक्टरची नगरी, राजघराणे शोकात बुडून गेले. वृद्ध प्रायॅम दुःखाने वेडा झाला; पण निदान पुत्रावर अंतिम संस्कार व्हावेत, ही तळमळ त्याला लागून राहिली होती.तो स्वतः एकटा रात्री गुप्तपणे अकिलीसच्या तंबूत गेला.अकिलीसने हेक्टरचा मृत देह परत दिला. त्याचे अंत्यसंस्कार होईपर्यंत युद्ध बंद ठेवण्याची प्रायॅमची विनंती मान्य केली.

'ओडिसी' हे होमरचे दुसरे महाकाव्य. ट्रॉयच्या दहा वर्षे चाललेल्या महायुद्धात ओडिसिअसने महत्त्वाची भूमिका बजावली.सुप्रसिद्ध लाकडी घोडा तयार करण्याची कल्पनाही ओडिसिअसचीच होती.अकिलीसला युद्धामधे भाग घेण्यासाठी ओडिसिअसने तयार केले होते.युद्धात पराक्रम गाजवला तर अकिलीस अल्पायुषी होणार होता, म्हणून त्याची आई थेटिस त्याला जाऊ देत नव्हती.अ‍ॅगॅमेम्नॉन बोलवायला येणार म्हणून अकिलीस स्त्रीवेषात अंतःपुरात जाऊन लपला असावा असा ओडिसिअसचा अंदाज होता; पण त्याला शोधून बाहेर कसे काढायचे? तेव्हा ओडिसिअसने स्त्रियांच्या वस्तू विकणाऱ्याचा वेष घेतला आणि तो महालात गेला. त्याच्या विक्रीच्या वस्तूंमध्ये एक तलवारही होती. स्त्रिया अलंकार उचलून पाहू लागल्या. एकच हात तलवारीवर पडला, तो ओडिसिअसने घट्ट पकडला. तो अर्थातच अकिलीसचा हात होता. त्याला युद्धासाठी जावेच लागले.

युद्ध संपल्यानंतर ओडिसिअस आपल्या इथाका राज्याकडे जायला निघाला.पॉसिडॉन या समुद्रदेवाने 'ओडिसिअसला घरी पोचायला दहा वर्षे लागतील आणि तो एकटाच पोचेल.' असा शाप दिला होता.या प्रवासात त्याने इतके विलक्षण अनुभव घेतले की त्यामुळे आजही एखाद्या अती अवघड आणि वैविध्यपूर्ण प्रवासाला ओडिसी म्हटले जाते.

प्रत्येक मुक्कामात त्याच्याबरोबरचे थोडे थोडे खलाशी मरण पावले.ओडिसिअसची जहाजे,जि कमलफळे खाल्ल्यावर माणूस सर्व काही विसरतो अश्या कमलभक्षक लोकांच्या बेटाजवळ गेली.ओडिसिअसला ही माहिती असल्याने त्याने सर्वांना वाचवले; पण दोन खलाश्यांनी फळे खाल्ल्यामुळे ते सर्व काही विसरले.

एका बेटावर सायक्लॉप्स या कपाळावर व एकच डोळा असलेल्या राक्षसाला आंधळे करून ते निसटले.एओलस या राजाने प्रतिकूल वाऱ्यांना जीमधे पकडून ठेवलेले होते ती एक थैली ओडिसिअसला दिली.अनुकूल वाऱ्याबरोबर जात असताना काही खलाश्यांना ती पैशांची थैली वाटून त्यांनी ती उघडली. प्रतिकूल वारे सुटले आणि पुन्हा जहाजे भरकटली. एका बेटावर नरभक्षक टोळ्यांना काही खलाशी बळी पडले. सर्सी या चेटकिणीच्या बेटावर तिने निम्म्या खलाशांना जादूने डुक्कर करून टाकले. ओडिसिअसला हर्मिसने एक द्रव्य दिलेले असल्याने त्याच्यावर काही परिणाम झाला नाही, उलट त्याने तलवार उगारली. तेव्हा चकित होऊन ती त्याला शरण गेली व त्याच्या प्रेमातच पडली. तिने सर्व खलाशांना पुन्हा मानव रूपात आणले. सर्वजण वर्षभर तिथे मजेत राहिले. मग तिचा निरोप व सूचना घेऊन निघाले. वाटेत सायरन या गाणाऱ्या राक्षसिणींचा खडकाळ प्रदेश होता. त्या गाण्याने मोहित होऊन प्रवासी तिकडे जात आणि जहाज खडकावर आपटून मरून जात. म्हणून तिथे ओडिसिअसने खलाशांना त्यांच्या कानांत मेण घालायला लावले. शिवाय त्याला स्वतःला खांबाला बांधून ठेवायला सांगितले. त्यामुळे त्याने गाणे ऐकले; पण तो पुढे गेला नाही. एका ठिकाणी जहाज सिला नावाचा सहा तोंडांचा राक्षस आणि चॅरिब्डिस हा समुद्रातला भोवरा यांच्यामध्ये अडकले.सहा खलाशांचा बळी देऊन ते पुढे गेले. एकदा एका बेटावर जवळचे अन्न संपले म्हणून कुरणात चरणाऱ्या मेंढ्या मारून खाल्ल्या आणि हेलिओस देवतेचा कोप ओढवून घेतला. झ्यूसने वादळ निर्माण केले. ओडिसिअसला कॅलिप्सोच्या बेटावर आश्रय घ्यावा लागला.

या प्रवासा ओडिसिअसने अधोलोकाला, मृतांच्या प्रदेशाला भेट देणे व आत्म्यांना भेटणे हा यातील चमत्कृतिपुर्ण भागा. समोर त्याच्या आईचा आत्मा दिसल्याने इथे त्याला धक्का बसला.त्याच्या दीर्घ वियोगाच्या दुःखाने ती मरण पावली होती. तिच्याकडून त्याला पहिल्यांदाच इथाकाची हालहवाल कळली. त्याची पत्नी पेनेलोपी एकनिष्ठपणे त्याची वाट पाहात होती; पण अनेक राजे तिला मागणी घालायला जमले होते. त्यांना हाकलून लावणे तिला व तरुण मुलगा टेलेमॅकस याला जमत नव्हते. ओडिसिअस अकिलीसच्या, अ‍ॅगॅमेम्नॉनच्या आत्म्यांना भेटला. शिवाय त्याच्या एका खलाशाचा, एल्पिनॉरचा आत्माही त्याला भेटला. त्याने सांगितले, की तो सर्सीच्या बेटावर मेला होता. दारू पिऊन तो छपरावर गेला आणि खाली पडून मेला. त्याने विनंती केली की त्याच्या शरीरावर अंत्यसंस्कार करावेत. 

नंतर ओडिसिअस फेशिअन्सच्या राज्यात पोचतो. तिथली राजकन्या नॉसिका व तिचा पिता यांनी त्याला मदत केली. अखेर तो एकटा सुरक्षितपणे इथाकाला पोचतो. तेथे पेनेलोपीसाठी मुक्काम ठोकून बसलेल्या राजांना कसे हाकलायचे हा प्रश्न त्याच्या पुढे होता. पेनेलोपीने त्यांना टोलवले होते. एकदा सांगितले होते, की सासऱ्यासाठी शाल विणते आहे, ती विणून झाली की निर्णय घेते. दिवसा विणलेली शाल रात्री उसवून ती दिवस काढत होती; पण ती युक्ती त्यांना कळल्यावर पुन्हा त्यांचा तगादा सुरू झाला होता की दहा वर्षे झाली, आता ओडिसिअस कसला परत येतो! तू आमच्यापैकी कोणाला तरी निवड. त्यामुळे एकदम प्रकट न होता ओडिसिअस त्याच्या विश्वासू माळ्याच्या घरी थांबला.वेष बदलून आलेल्या ओडिसिअसला त्याचा कुत्रा आर्गस याने ओळखाले व आनंदाने ओडिसिअसच्या पायात घोटाळून प्राण सोडले. जणू ओडिसिअसला भेटण्यासाठी त्यानं प्राण धरून ठेवले होते.अगदी पेनेलोपीनेही शंका आली असली तरी,त्याला ओळखले नव्हते. त्याची दाई युरिक्लिया ,अतिथी आला म्हणून त्याचे पाय धुवायला आली तेंव्हा त्याच्या पायावरची जुनी जखमेची खूण तिला दिसली आणि तिनेही त्याला ओळखले. पण ओडिसिअसने तिला गप्प केले. मग मुलगा टेलेमॅकस, पेनेलोपी व युरिक्लिया यांच्या मदतीने त्याने एक योजना आखली. सर्व शस्त्रास्त्रे एकत्र गोळा केली. पेनेलोपीने जमलेल्या राजांना कळवले की जो ओडिसिअसच्यासारखा कुऱ्हाडीच्या बारा दांड्यांमधून बाण मारू शकेल त्याला ती स्वीकारेल.पण हा पण कोणालाच जिंकता आला नाही. ओडिसिअसने प्रकट होऊन बाण तर मारलेच शिवाय त्याच बाणांनी शस्त्रास्त्रांनी बेसावध राजांना आपल्या मुलाच्या मदतीने हरवले व राज्य संकटमुक्त केले.परंतु पेनेलोपीने त्याला लगेच स्वीकारले नाही. त्याला भूतकाळातल्या खुणा विचारल्या, तो तोच ओडिसिअस आहे याची खात्री पटली, तेव्हाच तिने त्याचा स्वीकार केला. पेनेलोपी एकनिष्ठपणे वीस वर्षे ओडिसिअसची वाट पाहात राहिली. तिने जमलेल्या राजांना दाद दिली नाही; मूल्यव्यवस्थेतला हा फरक लक्षणीय आहे.'ओडिसी'च्या शेवटी राजांना मारताना ओडिसिअस फेमिअस या कवीकडे वळतो तेव्हा फेमिअस निडरपणे सांगतो, 'राजा, मला मारशील, तर पस्तावशील. मी आहे कवी, देवतांची आणि श्रेष्ठ मानवांची गीते गाणारा. त्यांना अमर करणारा.' ओडिसिअसने त्याला मारले नाही.

सॉफोक्लीस या श्रेष्ठ नाटककाराच्या लेखणीतून उतरलेली इडिपस ही व्यक्तिरेखा 'आपलं सुख शहाणपणावर अवलंबून असतं, अहंकार संकटं निर्माण करतो' आणि 'पुढच्या क्षणाची शाश्वती कोणी देऊ नये' असे संदेश देते.सॉफोक्लीस व युरिपिडिस हे एस्किलसनंतरचे दोघे श्रेष्ठ ग्रीक नाटककार. या पैकी सॉफोक्लीस अधिक लोकप्रिय होता, असे दिसते. धार्मिक उत्सवातील सर्वाधिक नाट्यस्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. युरिपिडिसची 'फेद्रा,' 'अ‍ॅन्ड्रोमॅकी,' 'मेडिआ' ही नाटके प्रसिद्ध आहेत.सॉफोक्लीसने बहुधा १२३ नाटके लिहिली.त्यातली आज फक्त सात उपलब्ध आहेत. त्यामध्ये 'इडिपसची त्रिनाट्यधारा' आजही लोकप्रिय आहे. मानसशास्त्रज्ञ फ्रॉइडने 'इडिपस गंड' या नावाचा सिद्धान्त मांडल्यामुळे हा शब्द परिचित झाला आहे इडिपसची पुराणकथा विलक्षण आहे. 'इडिपस द किंग' हे त्रिधारेतलं पहिलं नाटक. थीब्जचा राजा लायस व राणी जोकास्टा यांचा इडिपस हा मुलगा. त्याच्या जन्मानंतर असे भविष्य वर्तवले गेले, की तो बापाला मारेल आणि आईशी लग्न करेल. अशा भीषण वार्तिकामुळे राजा लायसने त्याची टाच छेदली आणि त्याला निर्जन जागी सोडण्यासाठी नोकरांच्या हवाली केले; पण नोकरांनी त्याला न मारता एका धनगराकडे दिले. तेथून त्याला कॉरिंथला नेण्यात आले. राजा पॉलिबस व राणी मेरोपाने त्याचे संगोपन केले. त्यांनाच तो आपले आई-वडील समजत होता. एके दिवशी त्याला स्वतःविषयी तेच भविष्य ऐकायला मिळाले, म्हणून त्या भविष्यापासून दूर जाण्यासाठी त्याने कॉरिंथ सोडले. भटकत असताना तो एका तिठ्यावर आला आणि गाडीतून चाललेल्या एका वृद्ध माणसाबरोबरच्या जथ्याशी त्याची चकमक झाली. त्यात तो वृद्ध गृहस्थ जो थीब्जचा राजा होता , त्याच्याकडून मारला गेला.पुढे त्याची गाठ स्फिंक्सशी पडली. या अर्धसिंहमानवाच्या प्रश्नाचे उत्तर न देणाऱ्याला तो ठार मारीत असे. त्यामुळे थीब्जसाठी हे संकटच होते. त्याचा प्रश्न होता - असा प्राणी कोण, की जो सकाळी चार, दुपारी दोन व संध्याकाळी तीन पायांवर चालतो? इडिपसने तोपर्यंत कोणालाही न सुचलेले उत्तर दिले - 'माणूस. तो जीवनाच्या सकाळी चार पायांवर रांगतो, दुपारी दोन पायांवर चालतो व म्हातारपणी काठीच्या तिसऱ्या पायाचा आधार घेतो.' ते उत्तर ऐकून स्फिंक्स निघून गेला. इडिपसने थीब्जचे स्फिंक्सपासून रक्षण केले, म्हणून लोकांनी त्याला राजा केले आणि त्या काळच्या प्रथेप्रमाणे तिथल्या विधवा राणीशी त्याचा विवाह झाला. त्याला दोन मुली व दोन मुलगे झाले. सर्व काही व्यवस्थित असताना एके दिवशी थीब्जमध्ये प्लेगने माणसे मरू लागली. डेल्फीच्या देवळातून संदेश मिळाला की राजा लायसचा मारेकरी पकडला गेला नाही, त्या धार्मिक भ्रष्टाचारामुळे हे घडत आहे. इडिपसने प्रतिज्ञा केली की तो मारेकऱ्याला शिक्षा करणारच. त्याने टायरेसिअस या अंध भविष्यवेत्त्याला(ग्रीक संस्कृतीतील भविष्यवेत्त्यांना soothsayers किंवा 'seers' म्हणतात) विचारले, 'सांगा. तो कोण आहे? टायरेसिअस प्रथम गप्प झाला. मग म्हणाला, 'मला भरीला घालू नको. पस्तावशील. सत्य उकरायला जाऊ नको.' पण इडिपस हट्टाला पेटला. टायरेसिअसने सांगितले, 'तो पापी गुन्हेगार तूच आहेस.' इडिपस टायरेसिअसवर संतापला.परंतु कॉरिंथहून आलेला दूत, जोकास्टाचे कथन, म्हातारा धनगर या सर्वांच्या साक्षींतून इडिपसला कळते की बापाची हत्या व आईशी लग्न हे भयानक पाप टाळण्यासाठी ज्यांच्यापासून तो दूर निघाला ते कॉरिंथचे राजाराणी त्याचे खरे आईबाप नव्हतेच मुळी. उलट तो जिथे येऊन राजा होऊन स्थिर झाला तिथे त्याचे जन्मदाते आई-बाप होते. त्याने तिठ्यावर ज्याची हत्या केली तो राजा लायस होता व तोच त्याचा बाप होता. जिच्याशी लग्न करून त्याला चार मुले झाली ती जोकास्टा त्याची आई होती. आपले पाप स्पष्टपणे समोर आल्यावर इडिपस म्हणतो, 'जे पाहू नये ते मी पाहिले.' तो राणीच्या पिनेने आपले डोळे फोडून घेतो. जोकास्टा फास लावून घेते. तिचा भाऊ क्रेऑन थीब्जचा राजा होतो. अंध राज्यहीन इडिपस एकटा शहराबाहेर हाकलला जातो. त्याची मुले त्याला साथ देत नाहीत. फक्त इस्मेने आणि अॅन्टिगनी या त्याच्या मुली त्याला आधार देतात.

इडिपसच्या पापात त्याची स्वतःची जबाबदारी किती? तो तर या पापापासून दूर पळण्यासाठीच थीब्जला आला होता. मग त्याला इतकी शिक्षा कशी काय होतेया प्रश्नाचे उत्तर त्रिधारेच्या दुसऱ्या नाटकात 'इडिपस अ‍ॅट कलोनस' मधे मिळते. भटकणारा थकलाभागला इडिपस कलोनसला येतो. त्याला देवतांचा संकेत मिळतो की जिथे त्याची अंत्यक्रिया होईल ते ठिकाण पवित्र होईल.हे कळल्यावर क्रेऑन इडिपसला बोलवायला येतो. इडिपस तिकडे जात नाही. राजा थीसिअस त्याला आश्रय देतो. कारण इडिपसचा मृत्यू हे त्याच्या राज्याला वरदान ठरणार असते. अपोलो व अथीना इडिपसला पापमुक्त करतात. मरणाच्या वेळी पापमुक्त व शांत अश्या त्याचा आधीचा कडवटपणा लोपतो. याच नाटकात 'भारतातले शुद्ध सोने' असा उल्लेख ग्रीक वा भारत यांचा संबंध दाखवतो.

त्रिधारेचे शेवटचे नाटक 'अ‍ॅन्टिगनी'.क्रेऑनने तिच्या भावाची हत्या करुन तो देशद्रोही असल्यामुळे त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करायला बंदी केली आहे. अॅन्टिगनी मृतदेहावर अंतिम क्रिया करते व मृत्युदंडाची शिक्षा स्वीकारायला तयार होते.क्रेऑनचा पुत्र हेमनशी तिचा विवाह ठरलेला आहे.तो बापाला विरोध करतो व 'कुठलंच राज्य एका माणसाची मालमत्ता नसते हे बजावतो.क्रेऑन टायरेसिअसचंही ऐकत नाही.अखेर अॅन्टिगनीला एकाकी अंधाऱ्या गुहेत नेलं जातं. तिथे ती आत्महत्या करते. हेमनही तलवारीने स्वतःची हत्या करतो. त्या शोकाने क्रेऑनची पत्नी युरिडिसीही आत्महत्या करते.’'आपलं सुख शहाणपणावर अवलंबून असतं. अहंकार संकटं निर्माण करतो. देवतांना त्यांची देणी द्यायलाच पाहिजेत हे भरतवाक्य कोरस बोलतात

प्राचीन ग्रीक संस्कृतीतील अभिजात साहित्यामधे होमरच्या महाकाव्यांच्या खालोखाल येते ती त्यातील 'ट्रॅजेडी' किंवा शोकात्मिका.ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात अथेन्समध्ये ग्रीक पुराणकथांच्या पायावरच आधारित या वाङ्मयप्रकाराचा विकास झाला. डायोनिसस हा द्राक्षांच्या पिकाचा व द्राक्षांची दारू तयार करण्याच्या विधींचा देव.त्याच्यासाठी केल्याअजाणाऱ्या महोत्सवाच्या विधींतून या नाट्यप्रकाराची निर्मिती व विकास झाला. त्या वेळी अथेन्समध्ये या नाटकांच्या स्पर्धा होत असत.स्पर्धेतले मुख्य विजेते नाटककार म्हणजे एस्किलस, सॉफोक्लीस आणि युरिपिडिस.

एस्किलस योद्धाही होता आणि त्याच्या शौर्याबद्दल अथेन्सवासियांना मोठा आदर होता. त्याची सातच नाटके आज उपलब्ध आहेत. ओरेस्टिया ही त्याची त्रिनाट्यधारा पुराणकथेवरच आधारित आहे. या तीनपैकी पहिल्या नाटकाचे नाव अ‍ॅगॅमेम्नॉन आहे. अ‍ॅगॅमेम्नॉन मेनेलॉसचा वडील भाऊ आहे. मेनेलॉसच्या राणीला, हेलनला ट्रॉयच्या पॅरिस या राजपुत्राने पळवून नेले आणि ट्रॉय धमक्यांना दादही देत नसल्यामुळे युद्ध अपरिहार्य झाले. अ‍ॅगॅमेम्नॉन ची लढाऊ जहाजे कूच करत औलिसला पोचली; पण आर्टिमिस देवतेच्या कोपामुळे असे वारे सुटले की ती पुढे जाऊ शकली नाहीत. काल्कास या ज्योतिष्याने सांगितले, की आर्टिमिसला अ‍ॅगॅमेम्नॉन ची मुलगी इफिजेनिया हिचा बळी द्यायला पाहिजे, तर जहाजे पुढे जातील.इफिजेनियाचा बळी दिला गेल्याचे क्लायटेम्नेस्ट्राला कळल्यापासून ती अत्यंत क्रुद्ध झाली होती. त्या संतापामुळे तिने एजिस्थस या अॅगॅमेम्नॉनच्या चुलत भावाबरोबर संधान बांधले. एजिस्थसलाही अ‍ॅगॅमेम्नॉनचा सूड घ्यायचा असल्यामुळे त्याने तिला साथ दिली. नाटकाच्या प्रारंभी दिसते की ती अ‍ॅगॅमेम्नॉनची आतुरतेने वाट पाहते आहे. दूतांकडून तिला कळते, की दहा वर्षांचे युद्ध जिंकून तो कसांड्रा या ट्रॉयच्या राजकन्येला दासी म्हणून घेऊन येत आहे. तो आल्यानंतर प्रथम तिने प्रेमाचे नाटकही केले; पण नंतर मात्र एजिस्थसच्या मदतीने त्याच्यावर घाव घालून त्याला ठार केले. अतिशय प्रभावी भाषेत हे रक्तरंजित नाट्य सादर केले जाते. नाटकाच्या शेवटी कोरस मात्र या दोघांना बजावतात, की अ‍ॅगॅमेम्नॉनचा मुलगा ओरेस्टीस येऊन त्यांचा सूड घेईल. 

दुसऱ्या 'द लायबेशन बेअरर्स' या नाटकात दिसते की क्लायटेम्नेस्ट्राला अत्यंत वाईट स्वप्ने पडत आहेत, म्हणून तिने मुलगी इलेक्ट्रा व दासींना अ‍‍ॅमेम्नॉनच्या थडग्यावर तीर्थ शिंपडण्यासाठी पाठवले आहे. थडग्यावर इलेक्ट्राला दोन केसांच्या बटा दिसतात. ती ओळखते, की त्या ओरेस्टीसच्या आहेत, त्या त्यानेच खूण म्हणून ठेवलेल्या आहेत. त्याची आणि इलेक्ट्राची भेट होते. ते दोघे आणि त्याचा चुलत भाऊ पिलेडीझ सूड घेण्याची योजना आखतात. दुसरे दिवशी ओरेस्टीस आणि पिलेडीझ प्रवाशांच्या वेषात राजवाड्यात जाऊन सांगतात, की ओरेस्टीस मरण पावला आहे. क्लायटेम्नेस्ट्राला सुटकेचा आनंद होतो. ती एजिस्थसला बोलावते, तेव्हा ओरेस्टीस त्याला ठार मारतो. क्लायटेम्नेस्ट्रा ओरेस्टीसला जीवदानासाठी विनवणी करते, ओरेस्टीसच्या मनाची चलबिचल होते; पण अखेर पित्याच्या हत्येचा सूड घेणे हे कर्तव्य मानून तो आईची हत्या करतो. मात्र त्याच वेळी युमेनिडीज किंवा फ्यूरीज त्याला घेरतात. या प्रायश्चित्त देणाऱ्या शक्ती किंवा देवता असतात. त्या त्याचा अतीव छळ करत राहातात.

त्रिधारेच्या युमेनिडीज या तिसऱ्या नाटकात फ्यूरीजपुढे हताश झालेला ओरेस्टीस अथीना या देवतेला शरण जातो.अथीना बारा व्यक्तींची ज्यूरी तयार करते. त्यांच्यापुढे ओरेस्टीसचा खटला चालतो. ओरेस्टीसने रक्तासाठी रक्त ही अपोलोची नीतीच पाळली असल्याने,अकारण व स्वार्थासाठी हत्या केली नसल्याने अथीनाच्या मतामुळे तो निर्दोष ठरतो.अथीना फ्यूरीजना शांत करते व सांगते की व्यक्तिगत पातळीवर सूड घेत राहाणे वा सूडचक्र चालू ठेवणे हा न्याय असणार नाही.ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात एस्किलसने हिंसेचे चक्र थांबवून न्यायप्रणालीची प्रस्थापना दाखवली आहे. कायद्यांच्या विकासात बुद्धीचा वापर करण्याची आवश्यकता दाखवलेली आहे.

                                                                                                                           -- संकलक  श्रीकान्त फाटक


संंदर्भ: सुप्रिया सहस्रबुद्धे यांचे ऐकलेली व्याख्याने व  म.टा.मधिल लेख ,आंतरजालावरील उपलब्ध विविध स्रोत.



 

शनिवार, ९ जानेवारी, २०२१

परंपरा योगिनी संप्रदायाची :


मातृशक्तीची उपासना हे उद्दिष्ट असलेला ‘योगिनी संप्रदाय’ हा मध्ययुगीन काळातील  एक महत्वाचा संप्रदायत्यांचा उपासना मार्ग हा सर्वसामान्य नसल्यामुळे योगिनी संप्रदाया बद्दल गूढरम्य  काही प्रमाणात भीतीची अशी संमिश्र भावना आढळते

संपूर्ण भारतीय उपखंडात तसेच आग्नेय आशियात या संप्रदायाचे अस्तित्व होते.योगी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप हे योगिनी म्हणजेच योग साधनेतील प्रवीण स्त्री असे होते. चौसष्ट योगिनी मंदिर स्थापत्याच्या अस्तित्वामुळे या संप्रदायाकडे जगाचे लक्ष आकर्षित झाले

ओदिशातील हिरापूर  राणीपूर अशी दोन  मध्य प्रदेशमधील खजुराहो  भेडाघाट येथील दोन अशी चार ठिकाणी असलेली चौसष्ट योगिनींची मंदिरे प्रसिद्ध आहेत व प्रामुख्याने आकर्षणाची केंद्रे ठरली आहेतवर्तुळाकार विन्यास  चौसष्ट प्रकारच्या      वेगवेगळ्या मातृदेवता  त्यांची वर्तुळाकार स्थापना हे या मंदिर स्थापत्याचे मुख्य      वैशिष्ट्य आहेमूर्तीशास्त्राचा विचार करता हिरापूर येथील योगिनी या वाहनावर उभ्या   आहेत तर राणीपूर येथील नृत्य करताना दर्शविल्या आहेतभेडाघाट येथील योगिनी या   ललितासनात विराजमान आहेततरीही आपल्या रोजच्या देवींच्या तुलनेत येथील प्रत्येक देवीचे रूप हे निराळे आहेयेथील काही देवी या पशुमुखी असून प्रत्येकीची लांच्छनेही भिन्न आहेतम्हणूनच मूळ समाजप्रवाहापेक्षा या भिन्न संप्रदायाचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरते.

मध्ययुगाच्या प्रारंभिक इसवी सनाच्या जवळपास सातव्या शतकात योगिनी संप्रदायाची स्थापना झाली असे अभ्यासक मानतातयोगी  योगिनी या दोन्ही संज्ञा हिंदूबौद्ध तसेच जैन या तीनही धर्मामध्ये अर्थभाव बदलून वापरल्या जातातयाआधीच नमूद केल्या प्रमाणे प्रामुख्याने योग साधनेतील स्त्रीपुरुषां करिता या संज्ञांचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातोपरंतु कालपरत्वे शैवशाक्त  तांत्रिक संप्रदायांच्या       प्रभावामुळे योगिनी या स्त्री दर्शक संज्ञेची व्याख्या बदलल्याचे जाणवतेतांत्रिक संप्रदायाच्या अनुषंगाने अभूतपूर्व शक्ती असलेल्या स्त्रीला योगिनी असे संबोधले जातेतर योग  साधनेच्या बळावर ज्या स्त्रियांनी ज्ञान  शक्ती प्राप्त केली आहेअशा स्त्रियांची गणनाही या गटात होतेतर योगिनी संप्रदायात योगिनी ही संज्ञा दोन अर्थाने वापरली जातेपार्वतीच्या म्हणजेच आदिशक्तीच्या अंशात्मक रूपांना योगिनी मानले जाते तर तिच्या याच   संप्रदायातील योगावर प्रभुत्व मिळविलेल्या स्त्री उपासिकांना योगिनी याच नावाने      ओळखले जाते.

साहित्यिक  पुरातत्त्वीय पुराव्यांवरून योगिनी संप्रदायाचा प्रभाव     सातव्या ते पंधराव्या शतकाच्या कालावधीत असल्याचे लक्षात येते.

मुळातच योगिनी संप्रदायहा शाक्त संप्रदायाचाभाग असून तांत्रिक साधना या संप्रदायाचा  मूळ पिंड आहेइसवी सनाच्या दुसऱ्या शतकानंतर भारतीय समाजात शाक्त संप्रदायाचे   प्रस्थ वाढलेतत्कालीन शैवबौद्ध यांनाही शाक्त संप्रदायाच्या प्रभावापासून वेगळे राहणे शक्य झाले नाहीम्हणूनच पुढील काळात शाक्त उपासना ही शैव  बौद्ध या तत्त्वज्ञानाचा महत्त्वपूर्ण भाग झालीशाक्त संप्रदायामधे पुरुष  प्रकृतीच्या एकत्रित शक्तीला मानत असले तरी जगरहाटीच्या निर्मितीपालन आणि लय या कार्यात देवीच अधिक कार्यशील  असते अशी त्यांची ठाम श्रद्धा आहेशाक्त संप्रदाय हा मुळातच देवी उपासकांचा आहेत्यांच्या मूळ तत्त्वज्ञानानुसार शक्ती म्हणजेच देवी हीच सर्वश्रेष्ठ आहेम्हणूनच शाक्त     संप्रदायात स्त्री ही उच्च मानली जाते तर पुरुषाला दुय्यम स्थान आहेया संप्रदायाचा संबंध नेहमीच शैव संप्रदायाशी जोडला जातोम्हणूनच शक्तीविना शिव हा शव ठरतो हे लक्षात घेतले पाहिजे  शिवशक्तीच्या मिलनातून विश्वनिर्मितीचे कार्य चालू होतेअशी ही धारणा आहे

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असताततसेच दैवी साधना ही देखील अश्याच दोन बाजूंच्या आखीवरेखीव समीकरणातून अस्तित्वात येतेभारतीय साधना प्रवाहातील कधी काळी   समांतर गेलेल्या दोन बाजू म्हणजेच योग साधना आणि भोग साधनायोग साधनेत     शरीरातील सुप्त अवस्थेतील कुंडलिनी शक्ती जागृत करून सहजानंदाची प्राप्ती केली जातेनाथ संप्रदाय हा योगसाधनाप्रधान संप्रदाय आहेतर तांत्रिक संप्रदाय हे भोग साधनेला   प्राधान्य देतातम्हणूनच योगिनी संप्रदायातही भोग साधनेतील पंचमकारांना प्राधान्य   देण्यात आले आहे.

योगिनी संप्रदायाच्या केंद्रस्थानी दैवी शक्ती असलेल्या योगिनी कोण हे जाणून घेणे     महत्त्वाचे ठरतेयोगिनी या संकल्पनेचा सर्वात प्राचीन उल्लेख नवव्या शतकातील अग्नि पुराणाच्या बावन्ना व्या अध्यायात सापडतोनंतर मात्र योगिनींचे संदर्भ हे कालपरत्वे   साहित्यानुसार बदलत जातातअसे लक्षात येते व्या ते १३ व्या शतकातील चतुर्वर्ग    चिंतामणीप्रतिष्ठा लक्षणसारमायादीपिका या तत्कालीन ग्रंथांमध्ये योगिनी संप्रदायाचा  त्यांच्या साधनेचा उल्लेख येतोशिव पौराणिक कथांमध्येही त्यांचा उल्लेख प्रामुख्याने आढळतोतत्कालीन योगिनी तंत्रमाया तंत्रकामाख्या तंत्र हे योगिनी पूजेचे महत्त्व विशद करताततर १० व्या शतकातील कालिका पुराणात अर्थ  काम यांच्या प्राप्तीसाठी चौसष्ट योगिनींची पूजा सांगितलेली आहेस्कंद पुराणातील उल्लेखाप्रमाणे तांत्रिक शक्तीवरील त्यांचे प्रभुत्व हे त्या वाममार्गी असल्याचे दर्शवतेभयंकरीयमदुतीनरभोजीनी,प्रेतवाहिनी ही त्यांची तांत्रिक साहित्यातील नावे त्यांचे भयावह रूपही स्पष्ट करतेतर महाभागवत  पुराणानुसार योगिनी या मूळशक्तीच्या (देवीच्यासेविका आहेत असे नमूद केलेले आहे तर चंडीपुराणानुसार त्या देवीच्या शरीर अंशातून उत्पन्न झालेल्या आहेत.या सर्व संदर्भानुसारचौसष्टयोगिनी या तंत्रमार्गी आहेत हे स्पष्टच आहेप्राचीन साहित्यानुसार त्यांच्या संख्येत बदल होताना दिसतोकाही ठिकाणी चौसष्ट तर काही ठिकाणी एक्याएंशी योगिनी नमूद केलेल्या दिसतात .तसेच त्यांच्या  नामाभिधानातही विविधता आढळतेअसे असले तरी प्रामुख्याने बहुरूपातारानर्मदायमुनाशांतीवारुणीक्षेमंकरी ऐंद्रीवाराहीरणवीरा  वानरमुखीवैष्णवीकाळरात्रीवैद्यरूपाचाचकावेताळीछिन्नमस्तावृषवाहनाज्वालाकामिनीघटवाराकारकालीसरस्वतीविरूपाकावेरीभालुकानारसिंहीवीरजा,     विकटाननामहालक्ष्मीकौमारीमहामायारतीकरकरीसर्पस्यायक्षिणीवैनायकी  विंध्यवासिनीवीरकुमारीमाहेश्वरीअंबिकाकामायिनीघटवारीस्तुतीकालीउमा  नारायणीसमुद्राब्राह्मिणीज्वालामुखीआग्नेयीअदितीचंद्रकांतीवायुवेगाचामुंडा मुरतीगंगाधूम्रवतीगांधारीसर्वमंगलाअजितासूर्यपुत्रीवायुवीणाअघोराभद्रकाली यांचा समावेश होतो. योगिनी या शाक्त संप्रदायाच्या देवतात्यांना आवरण देवता असे   सुद्धा म्हटले जातेत्यांना पार्वतीच्या सख्या मानले गेले आहेयोगिनीतंत्रात त्यांची     उत्पतीत्यांची शक्ती आणि त्यांच्या कथा दिलेल्या आहेतदैत्य निर्दालनासाठी दुर्गेने    चौसष्टरूपे घेतली आणि त्यांच्या सर्वांच्या शक्तीनिशी दैत्याशी युद्ध केले आणि त्यात त्या दैत्याचा पराभव केला

या योगिनींच्या उत्पत्तीविषयी अनेक संदर्भ हे पौराणिक तसेच संस्कृत साहित्यात       सापडतातत्यानुसार मूलतत्यांचा संबध हा मातृकांशी जोडला जातोभारतीय परंपरेत   सप्तमातृका  अष्टमातृका या संकल्पना अस्तित्वात आहेतप्राचीन मंदिरांच्या भिंतींवरशिल्पांमध्ये कडेवरती लहान मुलांना सोबत घेतलेल्या या मातृदेवता दिसून येतातयाच  मातृकांना योगिनींच्या उत्पतीचे स्थान मानले जातेया मातृका मुख्य शक्तीपासून निर्माण झाल्या असून त्यांच्यापासून ज्या प्रतिशक्ती निर्माण झाल्या त्यांनाच योगिनी मानले   जातेमार्कण्डेय पुराणानुसार मुख्य शक्तीच्या म्हणजेच आदिशक्तीच्या राग  कोपातून अष्टमातृका निर्माण झाल्यायाच अष्टमातृकांच्या प्रत्येकी आठ सेविका अशा मिळून    चौसष्टयोगिनी तयार होतातत्या संदर्भात मार्कंडेय पुराणात एक कथा आहे.या कथेनुसार आदिशक्तीचे  कुंभनिकुंभ  रक्तबीज या असुरांविरुद्ध युद्ध सुरू असताना काही केल्या रक्तबीजाचा मृत्यू होत नव्हताब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडताच त्यातून अनेक रक्तबीज तयार होऊन त्याला अमरत्व प्राप्त होत होतेत्यामुळे युद्धाला बराच काळ लोटूनही युद्ध निकालात निघेनायामुळेच ब्रह्माविष्णूशिव   कार्तिकेयनरसिंहवराहइंद्र या देवतांनी आपल्या स्वत:च्या शक्ती स्त्री रूपात देवीच्या  मदतीसाठी पाठवल्यायाच शक्ती म्हणजे सप्तमातृका तर देवीने स्वतचामुंडा नामक   एक शक्ती निर्माण केली अशा मिळून अष्टमातृका निर्माण झाल्यायाशिवाय शिव पुराणात अंधकासुराची गोष्ट आहेया कथेनुसार अंधकासुरालाही अशाच स्वरूपाचे वरदान होते  त्याच्या वधासाठी सप्तमातृकांची निर्मिती झालीतर इतर साहित्यात योगिनी या आदि शक्तीच्या विविध अवयवांपासून निर्माण झाल्या असाही संदर्भ मिळतोतर अभ्यासकांच्या मतानुसार योगिनी उपासना ही लोकसंस्कृतीशाक्त  तंत्र यांच्या समीकरणातून      अस्तित्वात आली.

योगिनींची मंदिरे ही बहुधा गावाच्या वेशीवरएकांतात लोकवस्तीपासून दूर असतातया  देवींच्या उपासनेत इतर देवतांप्रमाणे सात्त्विक साहित्यांचा वापर  होतातांत्रिक विधींच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश होत होतायोगिनी साधनेत तंत्रोपासनेवर भर दिला जातो म्हणूनच पंचमकार हे महत्त्वाचे ठरतातपंचमकारांमध्ये मद्यमांसमत्स्यमैथुनमुद्रा यांचा समावेश होतोसाधकाला या पंचमकारांच्या साधनेतून ज्ञान  शक्ती  मिळतेयाशिवाय काही भयावह विधीही केले जातातत्यात शवच्छेदनासारख्या विधीचा  समावेश आहेयात मानवी मृतदेहाचे शीर शरीरापासून विलग केले जातेया विधीमागील हेतू मर्त्य जगातील सर्व प्रकारच्या मोहाचा त्याग सूचित करावयाचा असतो असे असले तरी हे विधी समाजमान्य नव्हतेकिंबहुना याच अघोरी विधींच्या प्रस्थामुळे पंधराव्या शतका पर्यंत अस्तित्वात असलेला योगिनी संप्रदाय हा समाजातून अचानक नाहीसा झाला

हिरापूर येथील मुख्य योगिनी ही आजही ग्रामदेवता म्हणून पुजली जातेत्यावरुन योगिनी ही संकल्पना बहुधा ग्राम देवतांवरून अस्तित्वात आली असावी असे मानले जातेअशाच स्वरूपाची संकल्पना कोकणातही पाहायला मिळतेकोकणातील मुख्य ग्राम देवतांची    संकल्पना सात बहिणींच्या नात्याने प्रसिद्ध आहेतया ग्रामदेवतांचाही संबंध सप्त मातृकांशी जोडला जातो.

 नाथ संप्रदायातील स्त्रियानाथ संप्रदायात नाथ योगींबरोबरच नाथ योगिनींनाही खूप    महत्त्व आहेया संप्रदायात शिवाबरोबरच शक्तीची उपासनाही प्रचलित आहेमत्स्येंद्रनाथ कौल-योगिनी संप्रदायाचेही प्रवर्तक मानले जाताततसेच नाथ-योगींबरोबर अनेक नाथ-योगिनींचे संदर्भ ग्रंथआख्यायिका  शिल्प यांमधून दिसून येतातनाथ संप्रदायाच्या गुरू-शिष्य परंपरेमध्ये आदिनाथ  गिरिजा यांच्यानंतर मत्स्येंद्रनाथगोरक्षनाथ  इतर नाथ-योगींची क्रमवारी पाहायला मिळतेया संप्रदायात चामुंडात्रिपुरासुंदरीहिंगलजाभैरवी बालसुंदरी यांची पूजा प्रचलित आहेमत्स्येंद्रनाथांच्या बऱ्याच प्रतिमा या शाक्त मंदिरां जवळ आढळून आलेल्या आहेतपरभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील खुराची देवी     मंदिरात त्यांची प्रतिमा गर्भगृहात कोरण्यात आलेली आहेगोरक्षनाथांच्या मते, ‘शक्तियुक्त शिव’ हेच अंतिम सत्य आहेहे शिवतत्त्व शक्तियुक्त आहेपरंतु शक्ती ही  शिवाहून भिन्न नसून ती तदंतर्गतच आहेनाथपंथीयांनी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही योगसाधनेची दीक्षा दिली होतीएकंदरीत नाथ संप्रदायात शक्ती उपासनेचे महत्त्व दिसून येते

नाथ संप्रदायाच्या उदयापासून अनेक स्त्रिया नाथ संप्रदायात दीक्षित झालेल्या दिसून येतातमयनावतीगोरक्षशिष्या मुक्ताबाईविमलादेवीआउसा  निवृत्तिशिष्या मुक्ताबाई   अश्या नाथ योगिनींची नावे सांगता येतीलशिवाय या संप्रदायात चौऱ्यांशी सिद्धांनाही   महत्त्व असल्याकारणाने त्यात कनखलामेखलालक्ष्मींकारा  मनीभद्रा नावाच्या     सिद्धिणीनाथ संप्रदायाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या मानाव्या लागतीलकनखला  मेखला ह्या कानिफनाथांच्या शिष्या होतनाथ संप्रदायातील काही तांत्रिक साधना नाथ-योगिनीं शिवाय पूर्ण मानल्या जात नाहीत.नाथ संप्रदायात विमलादेवी ही गोरक्षनाथांची प्रत्यक्ष  शिष्या होतीनाथ संप्रदायातील बारा उपपंथांपैकी ‘आई’ पंथाची प्रवर्तक विमलादेवी     समजली जातेविमलामाईचा पंथ म्हणून हा ‘माईपंथ’ वा ‘आईपंथ’ म्हणून ओळखला  जातोया पंथाचे रोहतक  हरिद्वार येथे मठ आहेतदाबिस्तानात आई पंथाचा उल्लेख   येतो

गोरक्षशिष्या मुक्ताबाईचे नाव नाथ संप्रदायात आदराने घेतले जातेतिचा संदर्भ       लीळाचरित्रात लीळा क्र.२२२४  (पूर्वार्ध)  दरम्यान ‘मुगुताबाई’ असा आलेला आहेमहानुभावीय परंपरेत सुरक्षित    असलेल्या संक्षिप्त चरित्रामुळे आद्य मुक्ताबाईच्या जीवनाविषयी महत्त्वाची माहिती    मिळतेलीळाचरित्रानुसार मुक्ताबाई विदर्भातील एलिचपूरच्या राजाची कन्या होती  नंतर उज्जैनच्या विक्रमादित्याची राणी बनलीतिने आपला दीर भर्तृहरीपासून परमार्थ प्रेरणा  प्राप्त केली होतीगोरक्षनाथांनी तिचे मूळचे ‘सत्यवंतीनाव बदलून ‘मुक्ताबाई  असे नवीन सांप्रदायिक नाव तिला दिले होतेविरागी बनल्यावर ती श्रीशैलम पर्वतावर   आश्रम उभारून योगसाधनेत मग्न झाली आणि योगिनी म्हणून तिची ख्यातीही झाली.   महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर  तिची भेट श्रीशैलम पर्वतावर तिच्या आश्रमात झाली  होतीतिचा उल्लेख तत्त्वसार   षट्स्थळ  या ग्रंथांत चांगदेवाचा गुरू म्हणून आलेला आहेविसा खेचर आपल्या षट्स्थळ ग्रंथात आपली गुरू-शिष्य परंपरा आदिनाथ,मत्स्येंद्र,गोरक्ष,मुक्ताबाई,चांगा वटेश्वर,विसोबा खेचर अशी    सांगतातविदर्भात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सालबर्डीच्या डोंगरावर गोरक्षशिष्या मुक्ताबाईचे भव्य समाधीमंदिर आहे.

लीळाचरित्रातील मुक्ताबाई  ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाई ह्या भिन्न व्यक्ती सांगितल्या जातातज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाई तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेल्याया      मुक्ताबाईला निवृत्तिनाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा दिली होतीराचिंढेरे यांच्या मते  चांगदेवाची मूळ गुरू गोरक्षशिष्या मुक्ताबाईच होतीपरंतु ती दिवंगत झाल्यानंतर      महाराष्ट्रात गाजत असलेल्या ज्ञानेश्वर मंडळातील बालयोगिनी मुक्ताबाईला त्यांनी गुरू म्हणून स्वीकारली असावीआद्य मुक्ताबाईचा योगाचा संवाद त्यांना या द्वितीय      मुक्ताबाईत आढळला आणि म्हणूनच त्यांनी तिचा सर्वभावे मुक्ताबाईचा पुनरावतार    म्हणूनच स्वीकार केला

ज्ञानदेवभगिनी मुक्ताबाईची गुरू-शिष्य परंपरा आदिनाथ-गोरक्षनाथ-गहिनीनाथ-निवृत्तिनाथ-मुक्ताबाई-चांगा वटेश्वर (चक्रपाणी)-विमलानंद-चांगा केशवदास-जनकराज-नृसिंह अशी आहेमुक्ताबाईचा चांगा वटेश्वराशिवाय ‘चैतन्य’ नामक आणखी एक शिष्य असल्याचे सत्यमालनाथांनी सांगितले आहे

बंगाल प्रांतातील गोविंदचंद्राची आई मैनावती ही जालंधरनाथांची शिष्या होतीतिने     आपल्या पुत्रालादेखील नाथ संप्रदायात येण्याचे आवाहन केले होतेचक्रधरस्वामींची शिष्या      ‘आउसा’ ही पूर्वी नाथपंथाची दीक्षित होती.दीक्षिताची कन्या : उपासनियाची सून : नाथपं-थी उपदेशु:’ असे तिचे वर्णन लीळाचरित्रात आले आहेगोरक्षनाथांचा नामोच्चार करूनच ती भिक्षा मागत असेया व्यतिरिक्त बहुडी योगिनीचा संदर्भ लीळाचरित्रातून प्राप्त होतो

नाथ-योगिनींच शिल्प : महाराष्ट्रातील काही मंदिरांवर नाथ संप्रदायाच्या अनुषंगाने नाथ-योगिनींचे शिल्पांकन केल्याचे दिसून येतेकाही नाथयोगिनी योगमुद्रेत साकारल्या आहेतरत्नागिरी येथील पन्हाळेकाजीबीड येथील कंकाळेश्वर मंदिरब्राह्मणीदभोई  श्रीशैलम येथील वास्तूंवर नाथयोगिनींची शिल्पे कोरण्यात आलेली आहेतओडिशा राज्यातील    मेघेश्वर मंदिरातील एका शिल्पात गोरक्षनाथांसमवेत काही योगिनीही दाखविल्या आहेतत्यांना या प्रतिमांमध्ये दंडकर्णकुंडलेयज्ञोपवितयोगपट्टा समवेत दर्शविले गेले आहे

हिरापूर येथील चौसष्ट योगिनी मंदिर वर्तुळाकार आहेहे मंदिर ..च्या नवव्या शतकात ब्रह्म राजवटीमधील हिरादेवीने बांधल्याचे सांगतातउघडय़ा आकाशाखाली चौसष्ट     कोनाडय़ांच्या रूपात असलेले हे मंदिर निश्चितच अत्यंत वेगळे आहेवालुकाश्मापासून   तयार केलेले हे वर्तुळाकार मंदिर खास वैशिष्टय़पूर्ण आहेत्याच्या आतील बाजूला कोनाडे असून प्रत्येक कोनाडय़ामध्ये काळ्या रंगाच्या ग्रॅनाईट दगडात घडवलेल्या एकेका देवीची  मूर्ती प्रतिष्ठापित केलेली दिसते.मंदिराच्यामध्यवर्ती मनुष्याच्या डोक्यावर पाय दिलेल्या कालीदेवीची मूर्ती आहेबुद्धीच्या मनावरील विजयाचे हे प्रतीक समजले जातेतिथेच एक मध्यवर्ती चौथरा असून त्याला चंडी मंडप असे म्हणतात.  

वामचार ही तंत्राची एक शाखा आहे.तर त्याची दुसरी शाखा आहे दक्षिणाचारदक्षिणाचारात केवळ उपासनेचे अवडंबर असतेतर वामाचारात वामा म्हणजे स्त्री आवश्यक असतेत्यातस्त्रीसंभोगाला अतिशय महत्त्व असतेया तांत्रिक आचारविचाराच्या ग्रंथांना आगम     म्हणतात.

याच्या उलट निगमनिगमात आपले वेदपुराणेइतिहासउपनिषदे आदी येतात.

तंत्रवाद्यांचा प्रवाह प्रामुख्याने शैव आणि शाक्त म्हणून वावरतोकालमुखपाशुपत   कापालिकलकुलिशगामपत्यसौरशाक्तभैरवनाथ हे सगळे तांत्रिकांचे संप्रदाय आहेतकाश्मीरआसाम आणि दक्षिणेत श्रीशैल ही शैव तांत्रिकांची प्रमुख केंद्रे होतीकोणार्क आणिखजुराहो येथील शिल्प या तांत्रिक शैवांचे आहे

बौद्ध धर्मातही हा तंत्रमार्ग प्रतिष्ठा पावलेला आहेबौद्धांच्या महायान पंथाचा एक भाग योगाचार आहेहा योगाचार पंथच नंतर तंत्रमार्गात रूपांतरीत झालाया तांत्रिक बौद्धांना वज्रयानमंत्रयानसहजयानकालचक्रयान अशी वेगवेगळी अवस्थानुसारी नावे आहेत

योगिनी कौलमत हा या तांत्रिक संप्रदायातील एक प्रख्यात संप्रदाय आहेत्रिक (अद्वैती शैव परंपरेचा प्रवर्तक जो त्र्यंबकत्याच्या त्र्यंबकमठिकेची एक शाखा कामरूपात प्रस्थापित झालेली होतीही शाखा अर्धत्र्यंबकमठिका अथवा उत्तरत्र्यंबकमठिका म्हणून प्रसिद्ध आहेतिचे प्रवर्तन त्र्यंबकाच्या दुहितपरंपरेतील मच्छंद अथवा मीन (मत्स्येंद्रनाथया सिद्धाने इसवी सनाच्या पाचव्या शतकात केलेया मठिकेशी निडित असणारा तांत्रिक संप्रदाय   योगिनी कौलमत या नावाने ओळखला जातोतर ही जी त्र्यंबकमठिका आहेती म्हणजे  आपले महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरयेथून द्वैतीअद्वैती आणि द्वैताद्वैती शैव तांत्रिकांचे संप्रदाय उदय पावलेयोगिनी कौलमत परंपरेतील पंधरावा पुरूष येथूच काश्मिरात गेला  आणि त्याने तेथे प्रत्याभिज्ञा संप्रदायाचा प्रसार केला.

योगिनी कौलमताचा प्रवर्तक मच्छंद याच्या पत्नीचे नाव कुंकणांबा असे आहेकुंकणा हे   रेणुकेचे एक पर्यायनाम आहेरेणुका अथवा कुंकणा देवीची उपासना दक्षिण भारतातविशेषतः आंध्रकर्नाटककोंकण आणि गोमांतकात वारूळ रूपात केली जातेवारूळ हे भूमीच्या योनीचे प्रतिक आहेकुंकणा ही ज्या प्रदेशाची अधिष्ठात्री देवी आहेतो प्रदेश कौंकण अथवा कोंकणकोंकणाचा आणि परशुरामाचा निकटचा संबंध आहे आणि परशुरामाची माता असे हे सर्व नाते आहेअसे एक चक्र पुरे होते

शैव परंपरेतला सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ म्हणून अभिनव गुप्त याचे नाव घेतले जातेहा दहाव्या  शतकाच्या शेवटी काश्मिरात होऊन गेलात्याने कामाचा जो अध्यात्मविचार मांडला आहे तो असा.जगात ज्याला आपण अनैतिक म्हणतो किंवा बीभत्स म्हणतो त्याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाहीकोणतीही वस्तू अथवा क्रिया शुद्ध,अशुद्ध , नैतिक,अनैतिक होत असेलतर ती हेतूमुळे होते

आत्मा हा आनंदमय आहेया आनंदाची प्राप्ती आणि या आनंदात विक्षांती हे जीवनाचे सर्वश्रेष्ठ साध्य म्हणजेच मोक्ष आहेहा मोक्ष शांतस्वरूप असल्यामुळे अर्हभावरहीत मनाने   रतिक्रीडा केली,तर त्या ठिकाणी मोक्षोपयोगी शांतरस आहेरतिक्रीडेचा आनंद आणि मोक्षाचा आनंद यांची जात एकच आहेअहंभाव आणि नीजत्व विसरल्यानंतर जो रतिभोग होतो तो मोक्षाचा मार्ग आहेया साठी पतीने स्वतःला शिवस्वरूप समजावे आणि पत्नीला शक्तिस्वरूपया दिव्य अवस्थेत जी रतिक्रीडा चालतेत्यातून श्रेष्ठ मानवाचा जन्म होतो

रतिक्रीडेत असणारा आनंद अधिक उत्कट आणि मुक्त व्हायला हवाहा मुक्त आनंद    अडथळ्याचे निवारण झाल्याशिवाय व्यक्त होऊ शकत नाहीत्यासाठी त्याचा सर्वात     महत्त्वाचा मार्ग मदिरा हा आहेयाला शैव परंपरेत शिवरस असे म्हणतातही दारू कशी  प्यावी हे कुलार्णवतंत्रात सांगितले आहे - 

पीत्वा पीत्वा पुनः पीत्वा यावत्‌ पतति भूतले।

उत्थाय  पुनः पीत्वा पुनर्जन्म  विद्यते।।

आनन्दात्‌ तृप्यते देवीमूर्च्छनाद्‌ भैरवः स्वयम्

वमनात्‌ सर्वदेवश् तस्मात्‌ त्रिविधमाचरत्।।

म्हणजे दारू पुन्हा पुन्हा प्यावीपीता पीता जमिनीवर पडावेउठल्यावर पुन्हा प्यावी    म्हणजे पुनर्जन्म संपतोदारू पिताना आनंदस्थानी देवीमुर्च्छास्थानी भैरव आणि वमनस्थानी सर्व देवता संतुष्ट होतातहिच्या गंधमात्राने पापनाश होतोस्पर्शमात्राने पुण्य मिळते कारण हा शिवरस आनंदाची अभिव्यक्ती करणारा आहे

तांत्रिक संप्रदायामध्ये मत्स्यमांसमदिरामुद्रा आणि मैथून या पंच 'कारांना खूप    महत्त्व आहेअभिनवगुप्त मात्र मकार तीन मानतात.

अभिनव गुप्तांनंतर सतराव्याअठराव्या शतकातील महाराष्ट्र,कर्नाटक,तामिळनाडू या    दक्षिण प्रदेशात भास्करराय अथवा भासुरानंदनाथ ह्या कौल तांत्रिकांचे नाव येतेअनेक ज्ञानशाखांवर त्यांचा अधिकार होतात्यांनी अनेक यज्ञ केलेमंदिरे उभारलीकाशी ते रामेश्वर विजययात्रा केलीअनेक शिष्य तयार केलेमहाराष्ट्रातील चंद्रसेन जाधव त्यांचे अनुयायी होते असा उल्लेख मिळतो .तंजावरच्या मराठी राज्यकर्त्यांनीही त्यांचा सत्कार केला होता. "नित्योत्सव ग्रंथाचा कर्ता उमानंदनाथतसेच मराठवाड्यातील देशिकानंदशुकानंद हे त्याचे शिष्य महाराष्ट्रीयच होतेत्यांचे उमरीवसमतकहाळे येथील मठ भास्कररायांच्या परंपरेतील होते.

सहजिया वैष्णव संप्रदाय हासुद्धा बौद्धांच्या वज्रयान,सहजयान या तांत्रिक संप्रदायांच्या प्रभावातून उद्भूत झालेला आहेया सहजिया वैष्णव संप्रदायाचे चंडिदासचैतन्य गौरांग  प्रभू हे अनुयायी होतेविशेष म्हणजे गौडिय वैष्णव आजही वैष्णवींशी तसलेच संबंध राखूनआहेततर या चैतन्यांच्या अनुयायांनी मधुरभावाचे पीक अमाप पिकविले.गुजरातमधील  वल्लभ नावाच्या साधूंचा पुष्टीसंप्रदाय असाच आहेवल्लभ साधू स्वतःस कृष्ण समजत आणि बायका स्वतःस राधा समजून सर्वतऱ्हेच्या क्रीडा ते करत.  

या तांत्रिक आचार-विचाराचे जे ग्रंथ आहेतत्यांत भगमालिनी रजस्वला स्तोत्र(यात रजस्वलेच्या सर्जनेंद्रियाच्या पूजेचे महत्त्व गायलेले आहे.),सौभाग्यभास्कर (कौलमत भाष्यकार भास्करराय हे या ग्रंथाचे लेखक), तसेच कौलज्ञाननिर्णयमच्छंद वा मच्छेंद्रनाथांचे कुलार्णवतंत्र यांचा समावेश होतोगोरक्षनाथांचे गुरू मच्छेंद्रनाथ वा      मत्स्येंद्रनाथ आणि कुलार्णवतंत्राचे लेखक वेगळे अन्‌ बरेच उत्तरकालीन आहेतपण गंमतीचा भाग म्हणजे गोरक्षनाथांचे गुरू मच्छेंद्रनाथसुद्धा स्त्रीराज्यात म्हणजे तांत्रिक योगिनींच्या जाळ्यात अडकले होतेअशीही कथा आहे.

असा हा कामाचा अध्यात्मविचार चौथ्यापाचव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत      भारतात मोठ्या प्रमाणावर सुरू असतानाच दुसरीकडे भक्तिसंप्रादायातील कृष्ण भक्त संत मीराबाईंचे नाव येते. ज्या स्वतःला राधा समजून कृष्णाची भक्ती करीत व त्यालाच आपला पती मानीत होत्या. त्यांच्या भक्तीला सासरच्यांचा तीव्र विरोध होता व त्यांनी मीराबाईंवर एकदा वीषप्रयोग केला होता असा उल्लेख लोककथांमधे येतो.

कृष्णाच्या भक्तांनीच हा मार्ग अवलंबिला होताअसेही नव्हेरामाच्या उपासकांनी अशाच  रसिक संप्रदायाची स्थापना केली होती. 

संदर्भ : मराठी विश्वकोष व आंतरजालावरील उपल्ब्ध साहित्य.

                                                                          श्रीकान्त फाटक