पाताळेश्वर
आज इतिहास कट्ट्यावर दुपारी चार वाजता श्रीकांत प्रधान सरांचा तास होता. विषय पाताळेश्वर लेणी. पुण्यात भर गर्दीतल्या जंगली महाराज रोड जंगली महाराज मंदिराला लागून फारश्या कुणाच्या खिजगणीत नसलेला हा कातळातील कोरीव ठेवा.
रेव्हेन्यू कोंलनीमध्ये १९७५ च्या दरम्यान तारा मावशी कडे आलो की माझ्याकडून पाताळेश्वराला हजेरी नक्की लावली जात असे॰त्यानंतर इंजिंनियरिंगला असताना एनसिआरला वा सोमनाथला चहा घेऊन तिथे आमचा वाचन कट्टा भरत असे.गेल्या वर्षी संचेतीला एका नातेवाईकांना भेटून आलेल्या इंडोलोंजिच्या मित्र मैत्रिणी बरोबर घालवलेले क्षण अजूनही आठवत होते.
तुषारचा फोन झाला व्होट्सपवर मेसेजेस पाठवले गेले व ठरलेल्या ४च्या वेळेऐवजी बरोबर ४.१५ वाजता एक एक करत लोक पोहचते झाले.
प्रवेशद्वारापाशीच दिसतो तो कळसाचा अवशेष. डाव्या बाजूस खड्ड्यामध्ये छोटेसे मंदिर व सभोवताली पुरातत्व खात्याने निर्माण केलेली एक छोटीशी बाग.वडाचे हिरवे झाड व त्याच्या पारंब्या.
बागेतून थोड्याफार पायर्या उतरून आपला प्रवेश होतो ते थेट लेण्यांच्या प्रांगणात. आजूबाजूचा सर्व एकसंध कातळ छिनून हा लेणीमंदीराचा विशाल देखावा इथे निर्माण केला गेला आहे. पायर्या उतरताच डावीकडे दिसते नंदीची एक जीर्णावस्थेतील प्रतिमा.समोर आहे अखंड पाषाणात खोदलेला गोलाकार नंदीमंडप. १२ स्तंभांनी आधार दिलेल्या या नंदीमंडपात आतमध्ये अजून चार स्तंभ आहेत व त्यामध्ये आगंतुक असा नंदी. ज्याच्या गळ्यातल्या माळा- माळांमध्ये गुंफलेल्या घंटा अगदी खुबीने कोरलेल्या.
अखंड कातळात कोरलेली लेणी व नंदीमंडप

नंदी

नंदीमंडप-चंद्रशिला

नंदीमंडप ओलांडुन पुढे मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना डावीकडे दिसतो एक पार व खडकात खोदलेली ओसरी. आत मध्ये आहेत दोन खांब (स्तंभ). आतमध्ये खोली आणि शेजारीच पाण्याचे टाके अशी याची रचना.
मुख्य प्रवेशद्वारापाशी उजव्या बाजूला देवनागरीतील एक अस्पष्टचा शिलालेख दिसतो .हा शिलालेख यादवकालीन असावा का ? पण ही लेणी खोदली गेली आहेत ती राष्ट्रकूट कालखंडात. इ.स. सातव्या ते आठव्या शतकात.
बौद्ध आणि ब्राह्मणी शैलीतील सर्वात मोठा फरक म्हणजे त्यांची रचना. बौद्धलेण्यांत विहार व चैत्य दिसतात तर ब्राह्मणी शैलीतील लेण्यांत सभामंडप व गर्भगृह. येथे विहार अजिबात दिसत नाहीत .विहार हे भिक्खू संघाच्या निवासासाठी असत. ही शैवलेणी. म्हणजे निव्वळ प्रार्थनामंदिरे ब्राह्मणी शैलीची.
डावीकडच्या कोपर्यात असलेली ओसरी.

देवनागरी लिपीतला शिलालेख

देवनागरी शिललेखाच्या उजव्या बाजूस दिसते शिल्पपटाचे काम. ते पाहून आम्ही लेण्यांमधे शिरलो. सभामंडप, तीन गर्भगृहे व बाजूने प्रदक्षिणामार्ग अशी याची रचना. सभामंडप तर अतिशय प्रेक्षणीय. १०/१० स्तंभांच्या तीन ओळींवर याचे छत तोललेले आहे. लेण्यांच्या दोन्ही बाजूंना काही अर्धवट देखावे कोरलेले दिसतात.
उजवीकडे लिंगोद्भव शिव
प्रदक्षिणामार्गात पाठीमागच्या उजव्या कोपर्यात अर्धवट खोदलेला खडक दिसतो.लेणी कश्या पद्धतीने कोरत असावेत ह्याचा अंदाज आपण तेथे बांधू शकतो.
पण हे लेणे अर्धवट का राहिले हे काही कळत नाही. यजमानाकडून धनाची कमतरता हे कदाचित एक कारण असावे असे वाटून जाते .
सभामंडपातील स्तंभांची रचना वेरूळची आठवण करून देते.

सभामंडपातील स्तंभांची रचना व भिंतीवरील अर्धवट देखावा

गुहेतील महादेव
गुहेतील महादेव

११ . गणपती व पार्वतीच्या मूर्ती

अर्धवट खोदलेला दगड

पाताळेश्वराचे दर्शन घेउन बाहेर आलो.हिरवळीवर प्रश्नोत्तरांसह गप्पां रंगल्या.सहा वाजता सभा विसर्जित झाली व आम्ही काही शेजारच्या दुर्गा मध्ये कॉफी घेण्यास गेलो .गप्पा मारता मारता .सात कधी होऊन गेले ते कळलेच नाही.

तर डावीकडे काही भग्न/न ओळखता येणारा देखावा.डावीकडच्या कोपर्यात समोरच्या भिंतीवर गजासुरवधासारखा (?) देखावा कोरलेला दिसतो.